निर्भीडसत्ता न्यूज –
निगडी रावण सेना टोळीतील प्रमुख गुन्हेगारीतील तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास आकुर्डी येथील शीतलादेवी मंदिराजवळ घडली. या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अनिकेत जाधव असे तरूणाचे नाव आहे. अनिकेतवर अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने अनिकेत वर दगडाने आणि कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. ही हत्या पूर्ववैनस्यातून झाली असल्याची माहिती पोलीसांनी सांगितले.