निर्भीड न्यूज
पूर्वांचल विकास मंचतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आकुर्डी येथे खंडोबा माळ चौकात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नाम’ फाऊंडेशनला 51 हजार रुपयांचा निधीही या वेळी देण्यात आला. भोजपुरी सांस्कृतिक कार्यक्रमही या वेळी सादर करण्यात आला. सुमारे पाच हजार भोजपुरी समाजबांधव या वेळी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, महापौर शकुंतला धराडे, पूर्वांचल विकास मंचचे अध्यक्ष विकास मिश्रा, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार, शिवसेनेचे नेते आणि मंचचे आधारस्तंभ विजय गुप्ता, भोजपुरी चित्रपट निर्माता प्रेम राय, शिवसनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, राजेश पिल्ले , विलास मडिगेरी, अनुप मोरे, नगरसेवक दत्ता साने, विजय ऊर्फ शीतल शिंदे, कार्तिक लांडगे, बाबासाहेब धुमाळ, माणिक दुधाने, अमित भोसले, प्रमोद कुटे आदी या वेळी उपस्थित होते.
मंचतर्फे दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. त्यासाठीचा 51 हजार रुपयांचा धनादेश ‘नाम’ फाउंडेशनचे प्रतिनिधी अमित गोरखे यांच्याकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. प्रख्यात भोजपुरी अभिनेता रवि किशन, पवन सिंग, दीपक दिलदार यांना पुणेरी पगडीने सन्मानित करण्यात आले.
विजय गुप्ता या वेळी म्हणाले की, पूर्वांचल विकास मंचतर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रुग्णवाहिकेचे लोकार्पण होय. यासह शैक्षणिक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून उपाययोजना करण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह परिसरात भोजपुरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाचे संघटन करून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, विकास मिश्रा, प्रेम राय यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. शिवसेनेचे नेते आणि मंचचे आधारस्तंभ विजय गुप्ता, भोजपुरी चित्रपट निर्माते प्रेम राय, पूर्वांचल विकास मंचचे अध्यक्ष विकास मिश्रा, कार्याध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव, महासचिव बबलू अहिर, कोषाध्यक्ष आलोक सिंह, उपाध्यक्ष नेताजी सिंह, गिरीजेश गिरी, सचिव अहमद खान, स्वामीनाथ सिंह, अशोक दास, अमित यादव, बजरंगी गुप्ता यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
भोजपुरी गायक मंतेश मिश्रा, गायिका सीमा राय यांनी भोजपुरी चित्रपटांतील गीतगायन केले. भोजपुरी अभिनेता रवि किशन, पवन सिंह, दीपक दिलदार, राकेश मिश्रा, भोजपुरी अभिनेत्री काजल राघवाणी, प्रिया सिंह, प्रियंका पंडित यांनी या वेळी नृत्य सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली. अनिल यादव यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.