निर्भीडसत्ता न्यूज –
यमुनानगर सेक्टर २२ बौद्धनगर येथील भुमिगत विद्युत लाईन किंवा लोखंडी पोल नविन बसविण्याबाबत विद्युत विभागात मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी निवेदन दिले आहे. नगरसेवक चिखले यांनी स्वतः परिसराची पाहणी केली.
बौघ्दनगर परिसरात ठिकठिकाणी विद्युत पोल पडलेले दिसले. काही पोलच्या मदतीला लाकडी चार चार खांब लावून विद्युत पुरवठा सुरुच असल्याचे निदर्शनास आले. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा धोकानिर्माण झाला आहे .हा धोका उदभवू नये व वेळीच दक्षता घेण्यासाठी नगरसेवक सचिन चिखले यांनी विद्युत विभागास निवेदन देऊन लवकरात लवकर काम सुरु करावे अशी मागणी केली आहे.