डॉ. देशमुख यांचे आयुक्तांना पत्र; गुन्ह्यासाठी मागितली परवानगी
निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय सतत डॉक्टरांच्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरते. महापालिकेच्याच एका डॉक्टरने रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांना दमदाटी करून धमकावण्यात आले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) घडला आहे. त्याची तक्रार महापालिका आयुक्तांपर्यंतही पोहचली असून डॉ. देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
महापालिकेचे वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांकडून रुग्णांची हेळसांड किंवा चुकीचे उपचार दिल्याचे प्रकार घडले आहेत. त्यातून अनेकवेळा वाद उद्भवले आहेत.
मात्र, रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारीही हमरी-तुमरीची भाषा करुन रुग्णालयातील वातावरण बिघडवत आहेत. तसाच प्रकार शुक्रवारी घडला आहे. रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी असलेले डॉ. पद्माकर पंडीत आणि डॉ. मनोज देशमुख यांच्यात चांगलाच वाद झाला. या दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषाही वापरली आहे.

याबाबत डॉ. देशमुख यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, डॉ. पद्याकर पंडीत यांनी सकाळी रुग्णालयात प्रवेश करतानाच रोखून धमकाविल्याचे म्हटले आहे. त्यांनी माझी पोहोच वरपर्यंत असून मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईल. माझ्या नादाला लागाल, तर मी सगळ्यांची वाट लावीन, अशा शब्दांत त्यांनी धमकविले आहे. याबाबत कामकाजासाठी घातक असून इतरांनाही इजा पोहोचवू शकतात. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी. तसेच, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मला परवानगी मिळावी, असेही डॉ. देशमुख यांनी नमूद केले आहे.