निर्भीडसत्ता न्यूज –
भोसरीत दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांनी एका तरूणावर गोळीबार केल्याची घटना घडली. यात तरूण जखमी झाला आहे. ही घटना आज (शुक्रवारी) चारच्या सुमारास भोसरीतील सहल केंद्रा जवळील फुगे-माने तालीम परिसरातील चांगभल अॅटो गॅरेज जवळ घडली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पंकज कांताराम फुगे असे गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून त्याला भोसरीतील ज्ञानेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अजिंक्य माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.