निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या क्रीडा महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, डॉ. रजनी इंदुलकर, इंडियन ज्युरी ऑफवर्ल्ड रेकॉर्डचे पवन सोळंकी, पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ. प्र. चि. शेजवलकर, डॉ. किशोर रक्ताळे, अनिता काटे, संचालक संतोष काटे, निलेश काटे, निहार काटे, लीना काटे, सुभाष एडके, बराटे सर यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी प्रीत शिरोडकर याने आवर्तसारणीतील १२५ मूलद्रव्ये उलट्या क्रमाने अतिशय कमी वेळात अचूकपणे बोलून दाखवली. त्यासाठी प्रीतच्या उपक्रमाबद्दल त्याचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
शाळेच्या मुख्याधिपिका सुषमा उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा सरदेसाई, रुपाली कुलकर्णी यांनी केले. आभार चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांनी मानले.