निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा गाड्यांच्या तोडफोडीची घटना घडली आहे. वाकड आणि पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी २० ते २५ दुचाकी आणि चारचाकी गाड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यात या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्याद्वारे गाड्या फोडणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेत आहेत.
वाकड येथील अशोका सोसायटी परिसरात लावण्यात आलेल्या ७ दुचाकी, ३ रिक्षा तसेच ३ चारचाकी गाड्या फोडण्यात आल्या आहेत. थेरगावमध्ये कैलासनगर परिसरात आणखी पाच गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक टेम्पो ट्रॅव्हलर, एक टेम्पो, तीन कारचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बिर्ला हॉस्पिटल रस्त्याला लावलेल्या आणखी १० ते १२ गाड्याही समाजकंटकांनी फोडल्या आहेत.