सैनिक टाकळी / प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
विद्यासागर हायस्कूल आकिवाट येथे माता पालक मेळावा उत्साहात साजरा झाला. श्री बाहुबली विद्यापीठाचे श्री विद्यासागर हायस्कल येथे मकर संक्रांती व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने माता – पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होत. उखाने, वनमीनिट शो, संगीत खूर्ची, योगायोग स्पर्धा अश्या विविध स्पर्धोत २१५ माता – पालकांनी सहभाग घेतला.
या वेळी प्रा. प्रकाश मेटकर यiचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रा.मेटकर यांनी’ मुले घडवताना’ या विषयावर मार्गदर्शन केले. विध्यार्थांशी पालकाचा संवाद, कुटूंब व आरोग्य कसे सांभाळावे, बुद्धी व भावनांचा मेळ, पाल्यावरती योग्य संस्कार कसे करावे, अंधश्रध्दा सोडून वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा अश्या विविध गोष्टी आपल्या व्याख्यानात प्रा मेटकरांनी सांगितल्या.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक पी .ए. मगदूम यांनी केले. सुत्रसंचलन ए .एस. चौगुले यानी केले. जे .एस .बडबडे, जे .एस गिताजे, एस .वाय पाटील यIनी संयोजन केले.