सैनिक टाकळी /प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
श्री विद्यासागर हायस्कूल येथे नेट परीक्षा उत्तीर्ण करणारे अकिवाटचे दिपक हूजरे आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कोल्हापूर जिल्हासंघातून निवड झालेली कु. चैताली राजेंद्र कोथळी, अकिवाटगावचे नवनिर्वाचित पोलिस पाटील सचिन कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर चौगुले होते. सरपंच विशाल चौगुले, उपसरपंच रामचंद्र गावडे, सर्व शालेय समिती सदस्य, तहसिलदार गुरुजी, आप्पासाहेब बडबडे, रावसाहेब नाईक, सुभाष सूर्यवंशी व ग्रामस्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी .ए. मगदूम यांनी केले. यावेळी प्रशालेत कुष्टरोग जागृती नाटीका, ऐरोबिक्स, मुलांनी बनवलेले हस्तलिखिताचे प्रकाशन, समूहगीत गायन, समूहनृत्य, देशभकती गीत व मुलांची भाषणे झाली.