निर्भीडसत्ता न्यूज –
च-होलीतील एका 17 वर्षीय तरुणाचा स्वाईन फ्ल्यू आजारामुळे मृत्यू झाला आहे. चालू वर्षात जानेवारी महिन्यातच स्वाईन फ्ल्यू आजारामुळे पहिला बळी गेला आहे.
या 17 वर्षीय तरुणाला स्वाईन फ्ल्यू झाल्याचे 22 जानेवारी रोजी समोर आले होते. सुरुवातीला भोसरीतील एका खासगी रुग्णालयात उपाचारानंतर 25 जानेवारीला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात या तरुणासा दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा रविवारी मृत्यू झाला. चालू वर्षात स्वाईन फ्ल्यूने हा पहिला बळी घेतला आहे. मागील वर्षामध्ये 61 जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला होता. तर वर्षभरात 413 स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले होते.