निर्भीडसत्ता न्यूज –
सांगवीतील बाबुराव घोलप उच्च व माध्यमिक विद्यालयातील माजी विध्यार्थी संघटनेच्या वतीने ५५ आदर्श शिक्षकांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम्.पवार, मुख्याद्यापक आबासाहेब भोसले, मुख्याधिपीका रमा चाबुकस्वार, मुख्यलिपीक एस. एस. चव्हाण, बाबुराव घोलप उच्च व माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब राक्षे, उपाध्यक्ष रामदास कस्पटे, सेक्रेटरी अविनाश जाधव, कोषादयक्ष हभप. महादेव भुजबळ, नितीन दाभाडे, नितीन नखाते, दिलीप खेडेकर, प्रवीण जगताप, पोपट झिंजुर्डे, विलास वाळके, विजय जगताप, बाळासाहेब टेकवडे सर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बाबुराव घोलप उच्च व माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यालयास मार्बलच्या सरस्वती व गणेशाची मूर्ती भेट देण्यात आली.