निर्भीडसत्ता न्यूज –
केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून शहरातील ड्रेनेजव्यवस्था सुधारणार आहे. या योजनेत मंजूर झालेला १४८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला आज (बुधवारी) स्थायी समितीने मंजुरी दिली. बोपखेल, चिखली आणि पिंपळे निलख या ठिकाणी एसटीटी प्रकल्प होणार आहेत. शहरातील गावठाण भागातील व जुन्या झालेल्या ड्रेनेजलाईन बदलण्याचे मोठे काम या प्रकल्पातून होत आहे.
स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती सीमा सावळे होत्या. शहरातून वाहणा-या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदुषित होते. त्यासाठी सक्षम यंत्रणा महापालिकेला आवश्यक होती. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत १४८ कोटींचा प्रकल्प मंजूर आहे. त्यानुसार निविदाप्रक्रिया राबवून काम काढण्यात आले असून त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून बोपखेल येथे ५ एमएलडी, चिखली येथे १२ एमएलडी आणि पिंपळे निलख येथे १५ एमएलडीच्या एसटीपी (मैलाशुध्दीकरण) प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चार पंपींग स्टेशन देखील उभारण्यात येणार
निगडी ते दापोडी रस्त्यालगतच्या गावठणात जलनिसःरण नलिका बदलल्या जाणार आहे. आकुडी, चिंचवड, थेरगाव, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, सांगवी, संत तुकारामनगर, रहाटणी, पिंपरी, भोसरी आणि काळेवाडी भागातील एकूण २०९ किमी जलनिस:ऱण नलिका बदलण्यात येणार आहेत. जुन्या झालेल्या नलिकांमुळे ताण येऊन ड्रेनेजव्यवस्था खराब होत असल्याने ही सुधारणा केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे शहरात नव्याने ३३ एमलडी क्षमतेचे मैलाशु्ध्दीकरण केंद्र उपलब्ध होतील. त्यातून ३९६ एमएलडी सांडपाण्यावर पालिकेला प्रक्रिया करता येणार आहे.