निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरात चार बलात्कार झाल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. एकाच दिवशी बलात्काराच्या वेगवेगळ्या चार घटना घडल्याने सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे.
हरी गोविंद राठोड, गणेश मारुती म्हस्के (रा. ताडीवाला रोड, पुणे), संतोष महाले (मूळगाव-अंतरवली, नाशिक) आणि अजय (पूर्ण नाव समजू शकले नाही) या चार जणांविरुध्द वेगवगेळे गुन्हे सांगवी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असून याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण देखील करण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार हरी राठोड याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दुस-या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने अजय विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यामध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.