निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळेसौदागर येथे प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री महोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १७ फेब्रुवारीदम्यान हा सोहळा चालणार आहे. नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी व वीणापूजन करून या हरिनाम सप्ताहाला सुरूवात करण्यात आली.
या अखंड हरिनाम सप्ताहचे हे २६ वे वर्ष आहे. अखंड हरिनाम सप्ताहांतर्गत रोज पहाटे चार ते सहा या वेळेत काकड आरती, सकाळी सहा ते साडेसहापर्यंत श्रींची आरती, सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी एक ते तीन या वेळेत महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हरिपाठ, सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत कीर्तन होईल.
शनिवारी हभप पारस महाराज मुथ्था यांचे कीर्तन होणार आहे. रविवारी (दि. ११) हभप दत्तात्रय महाराज जोशी, सोमवारी (दि. १२) हभप ज्ञानेश्वर माऊली पठाडे, मंगळवारी (दि. १३) महाशिवरात्रीच्या दिवशी हभप नवनाथ महाराज म्हस्के, बुधवारी (दि. १४) हभर विकासानंद महाराज मिसाळ, गुरूवारी (दि. १५) हभप प्रकाश महाराज साठे, शुक्रवारी (दि. १६) हभप संतोष महाराज पायगुडे यांचे कीर्तन होईल. शनिवारी (दि. १७) हभप शंकरमहाराज शेवाळे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या पारायण सोहळ्याचे शहरातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक नाना काटे यांनी केले आहे.