निर्भीडसत्ता न्यूज –
निगडीवरून पुण्याच्या दिशेने जाणा-या पीएमपी बसने अचानक पेट घेतला. ही घटना पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर आज (सोमवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. बसमधून वेळीच प्रवासी बाहेर आल्याने कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीचे लोळ सर्वत्र पसरले होते.