निर्भीडसत्ता न्यूज –
ईनर व्हीलच्या चार डिस्ट्रिक्टसच्या आयएसओएस एकत्र येऊन खडकी येथील आर्मीच्या अपंग पुनर्वसन केंद्रात आगळा वेगळा उपक्रम केला.
या कार्यक्रमाच्यावेळी ११० अपंग सैनिक, ईनरव्हील निगडी प्राईडच्या माजी अध्यक्षा आणि ईनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१३च्या आयएसओ मुक्ती पानसे, डिस्ट्रिक्ट ३०३च्या गिरीषा ठाकरे, डिस्ट्रिक्ट ३१४च्या सुनीता जैन तसेच डिस्ट्रिक्ट ३१७च्या महानंदा चंद्ररगे, इनर व्हील च्या ९० सदस्य ही कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी अपंग सैनिकांना टेबल टेनिस टेबल, बॅटस, बॉल्स देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बास्केट बॉलटिममध्ये ५ सैनिकांची निवड झाली आहे. त्यांना बॅंकाक येथे जाण्यासाठी अर्थ सहाय्य देण्यात आले. एकूण साडेतीन लाखाचा निधी जमा झाला.कार्यक्रमानंतर अपंग सैनिक केंद्राच्या मेडिकल डायरेक्टर कर्नल आर के मुखर्जी ह्यांचे कडे प्रकल्पाचा खर्च वजा जाता उरलेली रक्कम रुपये पावणेतीन लाख त्यांच्या अंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आली. ह्या उपक्रमात ११० सैनिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच त्यांना जेवणही देण्यात आले
ईनर व्हील निगडी प्राईड च्या अध्यक्षा सविता राजपुरकर आणि सभासद तसेच ईनर व्हील संगमनेर, डाउनटाउन, पुणे सेंट्रल, पिंपरी स्टार, खोपोली, न्यू पनवेल क्लबने सहकार्य केले.तसेच सोलापूर, जालना, महाबळेश्वर, पेण, आणि पुण्यातल्या तसेच गोवा, कर्नाटक, मुंबई, नाशिक, खानदेश आदी भागातील सभासदांनी सढळ हाताने मदत केली. जिल्हा अध्यक्ष डॉ सावित्री रघुपती इतर जिल्हाध्यक्षा उषा गौडर संगीता घोडगावकर आणि डॉ माधवी पंड्या यांचे सहकार्य लाभले.