निर्भीडसत्ता न्यूज –
शुद्ध सोने व पारदर्शक व्यवहाराकरिता प्रसिद्ध असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या प्रसिद्ध सुवर्णपेढीच्या चिंचवड शाखेला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त १८ फेब्रुवारीला (रविवार) दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धापनदिनी भाग्योदय योजनेचे (सुवर्णभिशी) सदस्य होणाऱ्यांना एक चांदीचे नाणे सप्रेम भेट देण्यात येणार आहे.
ग्राहकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व समाजाचे ऋण फेडण्यासाठी दरवर्षी चिंचवड शाखेचा वर्धापनदिन साजरा करण्यात येतो. यावर्षी १८ फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता चापेकर चौकातील कॉटनकिंगच्या दालनावरील मातोश्री हॉलमध्ये दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सजग नागरिक मंचचे अध्यक्ष व नामवंत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या संयुक्त रक्षा सेवा परीक्षेत देशात सर्वप्रथम आलेली पुण्याची श्रुती श्रीखंडे तसेच देशात चौथी आलेली किरण राऊत यांचा विशेष सत्कार वेलणकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याच बरोबर अनाथ मुलांसाठी कार्य करणारे एकता निराधार संघ संस्थेचे प्रमुख सागर रेड्डी यांचाही कार्यगौरव करण्यात येणार आहे.