निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम करीत असताना तोल जाऊन पडल्याने वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना (सोमवार) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
कचरू लिंबाजी डोंगरे (वय ६५) असे पडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमहापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजी करण्याचे काम सुरु आहे. कामगार डोंगरे हे तेथे कामाला आहेत. नेहमीप्रमाणे सभागृहाच्या सज्जावर उभे राहून सभागृहाला प्लास्टर करीत होते. यावेळी त्यांना अचानक भोवळ आल्याने त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. यात गंभीर जखमी झाल्लाने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.