निर्भीडसत्ता न्यूज –
स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड मूळच्या सातारा जिल्ह्यातील वेळे येथील आहेत. यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. गायकवाड या समाजकार्यात अग्रेसर राहिल्या आहेत. संघटन, युवक, युवती वर्गासाठी विशेष काम त्यांनी केले आहे. पाणीपुरवठा नियोजन, बचत गटामध्ये महिलांना स्वयंरोजगारासाठी विशेष योगदान, गरीब रुग्णांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत, आर्थिक मागास रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात त्या पुढे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड त्यांचे पती आहेत. ममता गायकवाड या भाजपच्या तिकीटावर प्रथमच प्रभाग क्रमांक 26 पिंपळेनिलख, विशालनगर, धनराज पार्क, वेणूनगर प्रभागातून निवडून आल्या आहेत. पालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ममता गायकवाड या पालिका स्थायी समितीच्या 34 व्या अध्यक्षा असणार आहेत.