निर्भीडसत्ता न्यूज –
नवी सांगवी येथील समतानगर गल्ली नं. २ मध्ये ड्रीनेजलाईनचे काम सुरू आहे. तेथे मोठे सिमेंटचे पाईप टाकले जात आहेत. परंतु, मागील दीड महिन्यापासून हे काम धिम्या गती सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण आहेत.
या रस्त्याने महाविद्यालयीन व शाळकरी मुले ही ये-जा करतात. रस्त्याच्या बाजूला दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. ठेकेदाराकडून कासव गतीने काम चालू आहे. आधीच धिम्या गतीने कम सुरू असताना मागील पंधरा दिवसापासून रस्त्याच्या मधोमध अर्धवट काम सोडले आहे.
वाहनचालकांना अरुंद रस्त्यामुळे पुन्हा वळून जावे लागते. रस्त्याच्या कडेला राडारोडा, दगड, माती असल्याने विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. अर्धवट कामामुळे ड्रेनेजच्या पाण्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका व ठेकेदाराने नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये. हे काम त्वरित चालू करून पुर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक श्रीकांत जोगदंड, विकास कुचरेकर, मुरलिधर दळवी, संगिता जोगदंड, अँड. सचिन काळे, विकास शहाने, अरुण मूसळे यांनी केली आहे.