निर्भीडसत्ता न्यूज –
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पॅंरालिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय जलतरणपटू मुरलीकांत पेटकर (पद्मश्री पुरस्कार विजेते) यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने मुरलीकांत पेटकर यांना सन्मानित केले आहे.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शशी जाधव, राकेश भास्कर, संजय कुटे उपस्थित होते.