निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या ‘अच्छे दिनची गाजर यात्रा’बैलगाडीतून काढण्यात येणार आहे. या यात्रेत वाढलेली महागाई व इतर समस्यांबाबत केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणार आहेत.
ही यात्रा उद्या शनिवार (दि.7 एप्रिल) सकाळी साडेदहा वाजता नवी सांगवी येथील साई चौक येथून निघणार असून या यात्रेचा समारोप पिंपळे गुरव येथील डायनासोर पार्क येथे होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली आहे.