निर्भीडसत्ता न्यूज –
जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे 19 ते 22 एप्रिल या कालावधीत कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा महोत्सव होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित राहणार आहेत.