निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळेसौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा उत्सवानिमित्त बुधवारी (दि. १८) निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळेसौदागरमधील महादेव मंदिराजवळ सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत या कुस्त्या होणार आहेत. पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने या निकाली कुस्त्या लावल्या जाणार आहेत.
कै. पै. दत्तोबा महादू काटे व कै. पै. रामचंद्र महादू काटे यांच्या स्मरणार्थ पै. वस्ताद अर्जुन दत्तोबा काटे यांच्याकडून विजेत्या पैलवानाला चांदीची गदा व एक लाख रुपये बक्षिस दिले जाणार आहे.
या निकाली कुस्त्यांसाठी काळुराम कवितके, संतोष माचुत्रे, बाळू काळजे, विजय कुटे, संदिप पठारे, निवृत्ती काकडे हे पंच म्हणून काम पाहणार आहे. या निकाली कुस्त्यांचे नगरसेवक नाना काटे यांनी संयोजन केले आहे.