निर्भीडसत्ता न्यूज –
शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी महापालिका प्लास्टिक कॅरीबॅगचे उत्पादन, साठा, विक्री आणि वापरबंदी मोहिम राबवित आहे. त्यानुसार महापालिकेच्या फ प्रभागाअंतर्गंत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या निगडीतील गोकूळ स्वीटमार्टवर कारवाई केली. त्यांच्याकडून चार किलो बॅग जप्त करून पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
फ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत सहायक आरोग्याधिकारी डी. जे. शिर्के, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांनी ही कारवाई केली. मंगळवारी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या निगडीतील गोकूळ स्वीट मार्टवर कारवाई करत त्यांच्याकडून चार किलो वजन असलेल्या पातळ प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. कॅरिबॅग बाळगल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिकबरोबर सार्वजनिक ठिकाणी राडारोड्या टाकणा-यांवरही महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. फ प्रभागाअंतर्गंच सहायक आरोग्याधिकारी डी. जे. शिर्के, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांनी मंगळवारी तळवडेतील ज्योतीबानगर येथे मे. इसरार महमद यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.