निर्भीडसत्ता न्यूज –
जम्मू काश्मीर मधील कठुआ अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ मानवी हक्क संरक्षण संघटना आणि जागृतीच्या वतीने पिंपळे गुरव परिसरात कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी पीडित चिमुरडीला श्रध्दांजली वाहण्यात आली. पिंपळे गुरव व राजमाता जिजाऊ उद्यान परिसरात कॅण्डल मार्च काढण्यात आला.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करावी अशी मागणी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी संस्थेच्या वतीने केली.