निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे रोजी झाली. याचदिवशी कामगार दिन सर्वत्र साजरा केला जातो. आजच्या धकाधकीच्या काळातकामगारांकडे समाजाचे दुर्लक्षीत होत आहेत. फक्त आपलेच काम करून घेण्यात सर्वच गर्क आहेत. परंतु, याच दिवसाचे औचित्य साधूनसमाजातून दुर्लक्षीत झालेल्या बांधकाम, स्वच्छता, टपाल कामगारांचा सत्कार होणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत आमदार लक्ष्मणजगताप यांनी व्यक्त केले. नगरसेवक नामदेवराव ढाके युवा मंचच्यावतीने १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच नगरसेवक नामदेव ढाकेयांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित कामगारांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. मंगळवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक १७मधील बिजलीनगर येथे झालेल्या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेवराव ढाके, स्थायी समितीसदस्य विलास मढेगिरी, ब प्रभाग अध्यक्ष करुणाताई चिंचवडे, प्रमोद मिसळ, प्रभाग समिती सदस्य बिभीषण चौधरी, देविदास पाटील, भाजपाकामगार आघाडी शहर उपाध्यक्ष शंकरराव पाटील, नगरसेवक शितल शिंदे, बाळासाहेब ओव्हाळ, शत्रुघ्न काटे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे,नवनाथ वाघमारे, सचिन चिंचवडे, समाज प्रबोधनकार निरंजन भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदारजगताप पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागातील घरे वाचविण्यासाठी नगरसेवक ढाके यांनी एक सामान्य कार्यकर्ताअसताना अनेक आंदोलन उभी केली. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून लवकरच अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.त्याचा फायदा या भागातील ९० टक्के लोकांना होणार आहे. त्याचप्रमाणे, शास्तीकराचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असल्याचेही त्यांनीसांगितले. गेल्या वर्षभराच्या काळात शहरातील कुठल्याही प्रभागात झाले नाही ऐवढी विकासकामे ढाके यांच्या वारंवार पाठपुराव्याने प्रभागातझाल्याचेही जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय किर्तीचे भारुडकार निरंजन भाकरे यांचे सामाजिक परिवर्तन वप्रबोधनात्मक विषयांवर भारुडाचा कार्यक्रम झाला. समाजातील जाती-पाती, मोबाईलच्या युगात ऱ्हासाला चाललेली भारतीय संस्कृती यावर त्यांनीप्रकाश टाकला.
तत्पूर्वी, सकाळी चिंचवडमधील गुरुकुलम् आश्रम शाळेतील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना फळ वाटप व अन्न शिदा वाटपाचा कार्यक्रम झाला.यावेळी, ॲड. सतिष गोरडे, गतिराम भोईर, सौ. मोहिते, जाधव, नगरसेवक नामदेव ढाके, बिभीषण चौधरी, आसाराम कसबे, शंकरराव देशमुख,संजय कुलकर्णी, शंकर पाटील, मनोज ढाके, अशोक बोडखे, भुषण सरोदे, नवनाथ वाघमारे, प्रदिप ढाके, शुभव ढाके, नितीन वाघमारे, हेमंतननवरे, संदिप महाजन, रविंद्र ढाके, कैलास रोटे, योगेश महाजन उपस्थित होते. दरम्यान झालेल्या रक्तदान शिबीरात ३६ बाटल्यांचे संकलनकरण्यात आले. पिंपरी येथील पीएसआय रक्तपेढीच्या सहकार्याने डॉ. दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रम संयोजनासाठी व्हिजन फाऊंडेशन पिंपरी- चिंचवड शहर, संवाद युवा प्रतिष्ठाण, चिंचवड, शिवनगरी प्रतिष्ठाण, सरदार वल्लभभाई युवामंचाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बिभिषण चौधरी यांनी केले.