निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवडमधील क्षितीज विचारे या तरूणाने सायकलवरून तीन देश आणि १३ राज्यातून तब्बल ८ हजार किलोमीटर प्रवास केला आहे. हा प्रवास ५७ दिवसांत पूर्णकरणाऱ्या या तरुणाचा महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ४) सत्कार करण्यात आला. नगरसेवक नामदेव ढाके व चंद्रकांत नखाते यावेळी उपस्थित होते.
क्षितीज विचारे या तरूणाने मुंबईतून या सायकल प्रवासाला सुरूवात केली. पुढे गोवा,कन्याकुमारी, रामेश्वरम, पश्चिम बंगाल, आसाम मार्गे भूतान, परत भारतातील सिक्कीम आणि नेपाळ असा त्याने प्रवास केला. त्याने सायकलवरून ८ हजार किलोमीटर एकटा प्रवास केला आहे. यासाहसी कामगिरीबद्दल त्याचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.