निर्भीडसत्ता –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 येथील हेमु कलानी उद्यानामध्ये येथील शहिद हेमु कलानी यांचा अर्ध पुतळा सुशोभिकरण करुन बसविण्यात येणार आहे.
या कामाचे भूमिपूजन गुरूवारी (दि. 17) सकाळी अकार वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते व महापौर नितीन काळजे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी खासदार अमरजी साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत. नगरसेवक झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून हे काम मार्गी लावल्याचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सांगितले आहे.