निर्भीडसत्ता न्यूज –
स्पा-मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणा-या या सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून तिन तरुणींची सुटका केली. चिंचवडगावातील गावडे बिल्डींगमध्ये काल शुक्रवारी ही कारवाई झाली असून सेंटरमालकाला अटक झाली आहे.
अविनाश देवीदास जोगदंड (वय 22, रा. सिध्दार्थ हौसिंग सोसायटी, निगडी) असे या मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगदंड हा मसाज सेंटरमध्ये ठेवलेल्या थेरपीस्ट महिलांकडून मसाजच्या नावाखआील वेश्या व्यवसाय करून घेत होता. ही गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार या सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून सेंटरमधून नेपाळची 1 आणि पुणे शहरातील 2 अशा तीन तरुणांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. जोगदंड याला पोलिसांनी अटक केली आहे.