निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २०, मधील शंकरवाडी, शेल पेट्रोलपंपा जवळील १२ मीटर रुंदीच्या व ९१० मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी झाला.
या कार्यक्रमास ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसदस्य शाम लांडे, रवि लांडगे, नगरसदस्या सुजाता पालांडे, आशा धायगुडे – शेंडगे, सुलक्षणा धर, प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य कुणाल लांडगे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय घुबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
शंकरवाडी नाल्यापासून ते जे.जे ग्लास कंपनी रेल्वे क्रॉसिंग पर्यंत रेल्वेच्या कडेने जाणारा १२ मीटर रुंद डी.पी रस्ता विकसित करणेत येणार आहे. त्या कामासाठी सुमारे ४ कोटी १८ लाख रुपये खर्च येणार आहे. या रस्त्यामुळे कासारवाडी कडून पिंपरीगावाकडे जाणेची सुलभ व्यवस्था होणार आहे.