निर्भीडसत्ता न्यूज –
‘मस्का’ या आगामी सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला. अल्पावधीतच या ट्रेलरला सिनेरसिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आजवर सोज्ज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘मस्का’ नेक्स्ट डोअरच्या बोल्ड भूमिकेत दिसणार आहे. या कथेत स्त्री पात्राची भूमिका जबरदस्त, धमाल आणणार आहे. या शिवाय अभिनेते शशांक शेंडे, विद्याधर जोशी आणि प्रणव रावराणे हे कलाकार देखील या चित्रपटात आहे. ‘मस्का’ मध्ये वेगवेगळी नावे वापरून पुरुषांची फसवणूक करणारी एक स्त्री असल्याचे दिसते ती नेमकी कोण? याचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे.
‘मस्का’ या चित्रपटाचे कथा लेखन आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेते प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. लेखक, अभिनेता, नाट्यदिग्दर्शक असलेले प्रियदर्शन जाधव या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. चिन्मय मांडलेकर, अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहरे, शशांक शेंडे, विद्याधर जोशी, प्रणव रावराणे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित, अमोल जोशी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’ चे प्रशांत पुरुषोत्तम पाटील निर्माते आहेत, तर प्रस्तुतकर्ता सायली जोशी, सचिन नारकर, विकास पवार आणि सह प्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि विनोद सातव आहेत. येत्या १ जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.