निर्भीडसत्ता न्यूज –
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) राम सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातपुते यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सातपुते यांनी विविध पदावर कार्य केले आहे. अभाविपच्या तंत्र शिक्षण विद्यार्थी परिषदेचे महाविद्यालय प्रमुख, प्रदेश सहमंत्री आणि प्रदेशमंत्री अशा विविध पदावर त्यांनी उत्कृष्ठपणे कार्य केले. विद्यार्थ्यांच्या अन्यायाला वाचा फोडली. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम सातपुते यांनी केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे आता भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.