निर्भीडसत्ता न्यूज –
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान चुलत बहिणीच्या निवडणूक प्रचारासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची बहीण नूरजहाँ हिनेच याबाबत खुलासा केला आहे. शाहरुखला प्रचारासाठी बोलावणार नाही, असे तिने म्हटले आहे.
पाकिस्तानात पुढील महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शाहरुखची चुलत बहीण नूरजहाँ या निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात आहे. खैबर पख्तुनखाँ प्रातांतून ती निवडणूक लढणार आहे. त्यामुळं शाहरुख बहिणीच्या प्रचाराला पाकिस्तानात जाणार का, यावरून चर्चा सुरू झाली होती. मात्र, ही चर्चा नूरजहाँनं फेटाळून लावली आहे.
माझ्यासाठी शांतता-सौहार्द अधिक महत्त्वाचा आहे. शाहरुखला प्रचाराला बोलावल्यास वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळं त्याला मी प्रचारासाठी बोलावणार नाही.