निर्भीडसत्ता न्यूज –
महाबळेश्वर तालुक्यातील उंबरी येथील पोलीस पाटलानेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित पोलीस पाटलाला तात्काळ अटक केली असून त्या नराधमावर पांचगणी पोलीस ठाण्यात पोक्सोकायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान उंबरी येथे मंगळवारी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान पीडित आठ वर्षाची बालिका व तिचा छोटा भाऊ खेळत असताना संतोष आनंदा उंबरकर (वय 36, रा.उंबरी) याने मुलीला माळ्यावर बोलावले. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार केला.