कलासंशोधनासाठी विश्वास मोरे यांना पीएच.डी
निर्भीडसत्ता न्यूज –
पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विश्वास मोरे यांना पत्रकारिता विषयात पीएच. डी. जाहिर झाली आहे. पत्रकारिता आंतरविद्याशाखेअंतर्गत ‘लोककला, ललितकला एक सामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक अभ्यास’ असा संशोधनाचा विषय होता.
सामाजिक प्रबोधनात कला या माध्यमाची असणारी भूमिका, त्यातून होणारे कला संवर्धन, कलेचा सामाजिक घटकांवर झालेला परिणाम, माध्यमांनी कला संवर्धनात बजावलेली भूमिका सकारात्मक कि नकारात्मक यांचा अभ्यास संशोधनात केला आहे. माध्यमांनी कला संवर्धनासाठी बजालेली भूमिका, समाज परिवर्तनात कलांची भूमिका याचा अभ्यास केला आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, विद्याचास्पती लोक आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, माध्यम विभागाच्या प्रमुख डॉ. गीताली टिळक- मोने, इतिहास विभागाचे प्रमुख व्हि. डी कुलकर्णी यांनी संशोधनासाठी मार्गदर्शन केले. मोरे हे संत साहित्य आणि कला साहित्याचे अभ्यासक ‘सामाजिक अभिसरण आणि सामाजिक परिवर्तनात महाराष्ट्रातील लोककला आणि अभिजात अशा ललितकला या माध्यमाने महत्वाची भूमिका मांडली बजावली आहे. त्यातून घडणारे परिवर्तन, समाजातील घटकांवर झालेला परिणाम याचा अभ्यास संशोधनात केला आहे.