महानगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ई प्रभाग कार्यालयात कार्यरत मीटर निरीक्षक शितल चतुर्वेदी यांची राजकीय दबावामुळे चुकीच्या पध्दतीने बदली करण्यात आली होती. त्या संदर्भात महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीची आयुक्त व प्रशासनामार्फत दखल घेऊन कार्यवाही होण्याआधी काही राजकीय मंडळींनी पत्नी शितल चतुर्वेदी व माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. पत्नी शितल ह्या त्यांच्या मनमानी कारभारासाठी साथ देत नसल्यामुळे खोट्या तक्रारी करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. याच महानगरपालिका प्रशासन कर्मचारी महिलेची बाजु घेण्याऐवजी राजकीय दबावाचे बळी ठरत आहेत, असा आरोप रोहित चतुर्वेदी यांनी केला आहे.
शितल चतुर्वेदी ई प्रभागात मीटर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची भोसरीतील ई प्रभाागातून थेट निगडीतील फ प्रभागात पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता आय्युब खान पठाण यांनी 8 जून 2018 रोजी बदली केली. या बदलीचे आदेश मिळाल्यानंतर त्यांना अशाप्रकारे तृतीय क्षेणीतील कर्मचा-याची बदली करण्याचे अधिकार नाहीत. तसेच, शितल चतुर्वेदी बदली चुकीच्या पध्दतीने झाली आहे. या संदर्भात पुराव्यानिशी महानगरपालिका आयुक्तांकडे शितल चतुर्वेदी यांनी 21 जून 2018 रोजी तक्रार केली.
या तक्रारीवर आयुक्त व प्रशासनाकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु, तसे झालेले नाही. त्या साठी 2 जुलै 2018 रोजी व नंतर 18 जुलै 2018 रोजी दोन स्मरणपत्रे देण्यात आली. त्यावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही.
चुकीच्या पध्दतीने बदली झाल्याची तक्रार महानगरपालिका आयुक्तांकडे केल्यानंतर राजकीय मंडळींकडून पत्नी शितल चतुर्वेदी यांना त्रास देण्याचा उद्योग सुरू झाला. माझ्या व्यावसायाचा आधार घेऊन माझ्यावर देखील आरोप केले गेले. आपल्यावर झालेल्या आरोपांना कुठलाही आधार नसून ते बिनबुडाचे आहेत.
माझा मीटर विक्रीचा व्यवयाय अधिकृतपणे आहे. पत्नी शितल चतुर्वेदी यांचे पद व त्यांच्या अधिकार कक्षेत मीटर देणे हा विषय येत नाही. कुठेही संबध नसताना आणि पुरावे नसताना देखील केवळ पत्नीला व मला बदनाम करण्यासाठी हे खोटे आरोप केले गेले. या सगळ्यामुळे पत्नी शितल चतुर्वेदी यांना मानसिक त्रास झाला आहे.
सन्मानीयांच्या आरोपांनंतर महानगरपालिका आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता आय्युब खान पठाण यांच्याकडून या संदर्भात कार्यवाही करत शितल चतुर्वेदी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यावर शितल चतुर्वेदी यांनी 18 जुलै 2018 रोजी लेखी खुलासा देखील सादर केला. परंतु पठाण यांना शितल चतुर्वेदी यांच्या बदलीबाबत महानगरपालिका प्रशासन विभागाकडून खुलासा मागितला होता. तो त्यांनी अजून देखील दिेलेला नाही.
या संदर्भात राजकीय मंडळी व महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून दुटप्पीपणाची वागणूक महानगरपालिकेच्या एका कर्मचारी महिलेला मिळत आहे. प्रशासन देखील पाठिशी उभा न राहता राजकीय दबावाचे बळी ठरत आहे. आमच्यावर हा अन्याय होत आहे. महानगरपालिका आयुक्त यांनी यातील सत्यता पडताळून योग्य न्याय द्यावा. त्यासाठी पीएमओ पोर्टल व आपले सरकार यावर देखील तक्रार केली आहे. राजकीय व्यक्तींकडून होत असलेली नाहक बदनामी व महानगरपालिका प्रशासनाकडून मिळणारी वागणूक या संदर्भात न्यायालयीन मार्गाने कायदेशीर लढा द्यावा लागेल, असे रोहित चतुर्वेदी यांनी सांगितले आहे.