निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला जाणार आहेत. तसे, आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तत्पुर्वी, उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा महापौर स्वीकारणार असून त्यानंतर महापौर काळजे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एका तासाच्या आत महापौरांना राजीनामा देण्याचा मोबाईलद्वारे एसएमएस पाठविला आहे. तत्पुर्वी महापौर काळजे हे उपमहापौर मोरे यांचा राजीनामा घेणार आहेत. त्यानंतर महापौर काळजे आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे राजीनामा देणार आहेत, अशी माहीती भाजपमधील विशेष सुत्रांकडून मिळाली आहे.