निर्भीडसत्ता न्यूज –
मेढा – जावली – भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेच्या नावाने जावली तालुक्यात अनधिकृत काम करणाऱ्यांवर कडक कार्यवाही केली जाईल. असा इशारा दशरथ कांबळे यानी दिला आहे.
दिनांक 27 जून 2018 रोजी भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका नूतन कार्यकारणी जाहीर झाली आहे. तालुका अध्यक्ष पदी दशरथ कांबळे व तालुका कार्यकारणी यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष धिरज जाधव यांच्या हस्ते झाली असून यापुढे जावली तालुक्यात वरील कार्यकारणी सक्रियपणे धार्मिक काम ( धम्माचा प्रचार व प्रसार )अतिशय जोमाने करणार आहे .
अधिकृत संस्थेशिवाय भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने दुसऱ्या कोणालाही जावली तालुक्यात अनधिकृत काम करता येणार नाही संस्थेच्या नावाने कार्यक्रम, हँडबील, पावती पुस्तके , मंगल परिणय प्रमाणपत्रे कोणीही देऊ नये
तसे आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निवेदन मेढा (जावली ) सहायक पोलीस निरीक्षक माने साहेब यांना देण्यात आले
या प्रसंगी आर पी आय जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे , भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष धिरज जाधव सर, तालुका अध्यक्ष दशरथ कांबळे, सचिव संतोष चव्हाण , जयसिंग रोकडे, वसंत चव्हाण गुरुजी , विकास तात्या जाधव, प्रवीण कांबळे , विजय गंगावणे , वामनराव जगताप , श्रीरंग कांबळे, दत्तात्रय जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्यात जावली पॅटर्न भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या बाबासाहेबांच्या तीन मातृ संघटना आहेत. त्या एकत्रितपणे काम करणार असून जावली पॅटर्न सर्व तालुक्यात राबविणार आहे. असा निर्धार आर पी आय जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी व्यक्त केला आहे.