निर्भीडसत्ता न्यूज –
धुळ्यामध्ये नंदुरबारच्या भाजपा खासदार हिना गावित यांच्या गाडीवर रविवारी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हल्ला केला होता. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात २५ जणांविरोधात अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासहित आयपीसीच्या कलम ३०७, १४३, १४७, ३४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार हिना गावित यांच्या गाडीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काल हल्ला झाला होता. या हल्ल्यातून गावित थोडक्यात बचावल्या होत्या. या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी तसेच सबंधित पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली होती.