निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहूल जाधव विदेश दौ-यावर जाणार आहेत. युरोपमधील आर्मेनिया देशातील येरेव्हान शहरात 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या देशात होणा-या आंतराष्ट्रीय महापौर परिषदेत ते पाच दिवस सहभागी होणार आहेत.
राहूल जाधव यांची नुकतीच महापौरपदी वर्णी लागली आहे. त्यानंतर काही दिवसांतच राहूल जाधव विदेश दौ-यावर निघाले आहेत. युरोप खंडातील आर्मेनिया देशातील या परिषदेत सहभागी होण्यासाठी पिंपरी-चिंचलडचे महापौर म्हणून निमंत्रण मिळाले आहे.
या निमंत्रणानुसार राहूल जाधव 7 ते 11 सप्टेंबर या पाच दिवसांच्या विदेश दौ-यावर जाणार आहेत. या दौ-याचा खर्च आंतराष्ट्रीय महापौर परिषदेच्या आयोजकांकडून केला जाणार आहे. मात्र, दौ-यासाठी महापौर जाधव यांना मोबाईलविषयक सुविधा पुरविण्याचा या दौ-याचा सर्व खर्च परिषदेच्या आयोजकांमार्फत केला जाणार आहेत.