निर्भीडसत्ता न्यूज –
शहरात स्वाईन फ्लूचा उद्रेक वाढत असून बुधवारी (दि.5) पुन्हा आणखी दोन रूग्णांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला. स्वाईन फ्लूने मृत झालेल्यांची संख्या १३ वर पोहचली आहे. तर, तब्बल २५ रूग्णांवर उपचार सुरू असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
थेरगाव येथील एका खाजगी रूग्णालयात माण येथील ७२ वर्षीय वृध्द महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. तर मलकापूर, बुलढाणा येथील ६० वर्षीय वृध्दाचा पिंपरीतील खाजगी रूग्णालयाय आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या २० दिवसांत शहरात स्वाईन फ्लूने तब्बल १३ बळी घेतले असून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.