निर्भीडसत्ता न्यूज –
घाटकोपर येथील दहीहंडीच्या उत्सवात भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्य केलं या त्यांच्या वक्तव्यावर अनेक संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी राम कदम यांच्यावर टीका केली. राज्यात अनेक ठिकाणी महिलांनी आणि युवतींनी आमदार राम कदम यांचा निषेध करत आंदोलनेही केली. या सर्व प्रकारानंतर आज अखेर आमदार कदम यांनी ट्वीट करून सर्व महिला, युवतींची माफी मागितली आहे.
आमदार राम कदम यांनी मागितली माफी
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हित शत्रूंनी हा वाद निर्माण केला त्यामुळे माता भगिनींंची मने दुखवली गेली. झाल्याप्रकरणी मी दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे.