मेढा । जावळी
निर्भीडसत्ता न्यूज –
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री वेण्णा जुनिअर व सिनिअर कॉलेज मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी विज्ञान विषयाचा शिक्षक उपलब्ध असताना विषय शिकवला जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ज्ञानदानाचे काम करीत नसतील तर त्यांचे आर्थिक लाभ कपात करावेत अशी मागणी करीत विज्ञान विषयाला शिक्षक न मिळाल्यास वेण्णाला ठाळे ठोकू असा इशारा निवेदनाद्वारे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संजय शेटे यानी दिला आहे.
मेढा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे ही शाळा नामांकीत आहे. येथे खेड्यापाड्यातुन विद्यार्थी येत असतात परंतु विज्ञान विषयाला शिक्षक शिकवाय नसेल तर नुकसानिस जबाबदार कोण ? सध्या शाळेचा कारभार अनागोंदी चालणार असेल तर शाळा बंद पडणार असे भाकित निवेदनात संजय शेटे यांनी केले आहे..
येथिल शाळेमध्ये कायम असणारे सौ निलम पाटील, सौ सुजाता काळभोर आणि एन आर पाटील हे तीनही शिक्षक एम एस सी बी एड झालेले आहेत. संबधीत विषय शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला असता सौ सुजाता काळभोर यांनी माझ्यावर किती विषयाचा अधिभार असे उत्तर पालकांच्या समोर दिले असे तक्रारीत शेटे यांनी म्हटले आहे.
संजय शेटे यांनी पुढे म्हटले आहे की, मुळातच त्या विज्ञान विषय शिकवतात का ? असे बोलणे योग्य आहे का ? याचा उलघडा व्हावा. घटक चाचणीच्या परिक्षेत मुल पेपर लिहिणार का ? असा प्रश्न उपस्थित करून मुलांच्या नुकसानीस जबाबदार कोण आशी विचारणा केली आहे.
बरेच शिक्षक हे सातारहुन ये- जा करीत शाखा चाळवतात. घरभाडे, दैनिक भत्ते घेतात पण सुविधा नाहीत. जादा तास सोडाच पण नियमीत काम किती करतात याचा विचार करावा असेही निवेदनात म्हटले आहे. आर्थिक लाभासाठी काम करणाऱ्या अशा शिक्षकांना तालुक्यातून नव्हे तर जिल्हयातून हद्दपार करा अशी मागणी करून विज्ञान विषयास शिक्षक न मिळाल्यास टाळे ठोको आंदोलन करणार आहे असे निवेदन संजय शेटे यांनी कार्याध्यक्ष, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, मुख्यध्यापक श्री वे०णा विद्या मंदिर मेढा यांना देण्यात आले आहे.