निर्भीडसत्ता न्यूज –
जुना बाजारजवळील शाहीर अमर शेख चौकात असलेल्या अवजड होर्डिंगचा संपूर्ण लोखंडी सांगाडा आज (शुक्रवार) दुपारी दोनच्या सुमारास अचानकपणे सिग्नल जवळ उभे असलेल्या सहा रिक्षा, एक दुचाकी आणि एका कारवर कोसळला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या जागेवर अनधिकृतपणे हे होर्डिंग उभे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जुना बाजार रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मृतांची नावे
भगवानराव धोत्रे (वय ४८)
भीमराव कासार (वय ७०)
शिवाजी देविदास परदेशी (वय ४०)
गंभीर जखमी
जावेद मिसबाऊद्दीन खान (वय ४९)
उमेश धर्मराज मोरे (वय ३६)
किरण ठोसर (वय ४५)
यशवंत खोबरे (वय ४५)
महेश यशवंतराव विश्वेश्वर (वय ५०)
रुक्मिणी परदेशी (वय ५५)
देवांश परदेशी (वय ४०)
समृद्धी परदेशी (वय १८)