निर्भीडसत्ता न्यूज –
नवरात्र उत्सवाच्या शेवटी दसरा सण साजरा करण्यासाठी झेंडुच्या फुलांची मागणी होते. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन-दिवसापासून ही फुले बाजारात विक्रीसाठी दिसू लागली आहेत. पिवळी, नारंगी अशा रंगातील ही फुले भक्तांना आकर्षित करत असून १०० ते १५० रूपये किलो अशा दराने विक्री होत आहे.
नवरात्र उत्सवाचा सुरूवात होवून आठ दिवस झाले आहेत. आदीशक्तीची ओटी भरण्यासाठी महिला गर्दी करत असून सर्वत्र वातावरण हे भक्तीमय झाले आहे. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी दसऱयाच्या सणाला सर्वात जास्त महत्त्व झेंडुच्या फुलांना असते. या फुलांची माळ करून घराच्या दाराला तोरण, दुचाकी-चारचाकी वाहनांना हार करून घातला जातो. ही फुले नारंगी आणि पिवळया रंगात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली असून दोन्ही फुलांचे दर एकसारखे असल्याने दोन्ही फुलांची सारखीच खरेदी होत या फुलांची खरेदी कमी अन् दरांची विचारणा केली जात आहे. जास्तीत जास्त ताजी फुले खेरदी करण्याकडे खरेदीदारांचा कल आहे.