‘परश्या आर्ची आली….’ अशी साद घालणाऱ्या लंगड्या प्रदीपची भूमिका जगभर गाजवणारा तानाजी गालगुंडे, लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. आगामी ‘माझा अगडबम’ या सिनेमाद्वारे तो पुन्हा एकदा झळकणार आहे. तृप्ती भोईर आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात तो ‘वजने’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.