निर्भीडसत्ता न्यूज –
ऐन दिवाळी सणात चार दिवस बँकांना सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. बुधवारी, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा अशी सुटी असल्याने दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी येणाऱ्या भाऊबीजेनंतर शनिवारी ९ नोव्हेंबर व रविवार ११ नोव्हेंबर अशी दोन दिवस सुट्टी असणार आहे. यामुळे नागरिकांना ऐन दिवळीत रोकड टंचाई भासू शकते.