निर्भीडसत्ता न्यूज –
रसिक मित्र मंडळ ‘तर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर डॉ . कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे . ‘एक कवी -एक भाषा ‘ या व्याख्यानमाले अंतर्गत हे व्याख्यान २३ नोव्हेंबर २०१८,शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे होणार आहे .
‘रसिक मित्र मंडळ ‘चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
मंगेश पाडगावकर यांच्या जीवनावरील काही दुर्मिळ ध्वनी -चित्रफिती तसेच अरुण दाते यांनी गायलेली पाडगावकर यांची भावगीते या वेळी दाखविण्यात येणार आहेत .
‘एक कवी -एक भाषा ‘ या व्याख्यानमाले अंतर्गत हे 59 वे व्याख्यान आहे