निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्या राज्यस्तरीय कुमार व महिला कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 5 खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा वर्धा येथे 28 ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कुमार गटात जाधव (45 किलो), संकेत माने (48 किलो), महिला गटासाठी स्वप्नाली काळभोर (53 किलो), कुमार गटासाठी आरती बाबे (43 किलो), पूर्वा जाधेकर (46 किलो) यांचा समावेश आहे. हे खेळाडू आकुर्डीतील श्री राजा शिवछत्रपती कुस्ती प्रशिक्षण केंद्रात राष्ट्रीय खेळाडू राजेश काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. त्यांना विजय कुटे, आकाश काळभोर, निवृत्ती काळभोर यांचेही मार्गदर्शन लाभले.